माझं आजोळ
माझं आजोळ " कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी " असं हे कोकण! जिथे माझं आजोळ, आणि माझी साधी भोळी माणसं. माझ्या आयुष्यातील माझी सर्वात प्रिय माणसं . त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहू असं वाटतं . अतिशय समृध्द असं बालपण मला लाभलं ते या प्रेमळ माणसांमुळे . माझे आजी आजोबा मामा मामी माझी भावंडं यांनी माझं बालपण अगदी व्यापून गेलंय. मनाच्या कप्प्यातल्या या आठवणी काळाच्या ओघात पुसून जाऊ नयेत म्हणून आणि व्यक्त व्हावंसं वाटतंय म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप . माझं आजोळ गुहागरचे . गुहागर तालुक्यात असगोली नावाचं छोटं गाव आहे तिथे माझं आजोळ! उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी आजोळी पळत असे . आई मला सोडून येत असे. अगदी सुरुवातीला माझ्याबरोबर तीही रहात असे पण नंतर नंतर तिला सुट्टी नसल्यामुळे मला सोडून परत येत असे. तो हि एक किस्साच आहे. आधी आईशिवाय न राहणारी मी एकदा कशीबशी तयार झाले राहायला तिच्याशिवाय आणि आई निघून गेली. पूर्ण दिवस छान निघून गेला आणि मग रात्री मात्र आईची आठवण यायला लागली आणि रडू यायला लागलं ,झालं! मामाने अस्मादिकांची रवानगी ...